Thursday, October 16, 2008

शिक्षकांचे विद्यार्थिनीस पत्र . . . . . . .

शिक्षकांचे विद्यार्थिनीस पत्र . . . . . . .

आता कुठे ...... ?
आयुष्यातली महत्वाची परिक्षा तू द्यायला निघालीस
पण आता तर तुझ्या खऱ्या परिक्षांना सुरवात होणार
अशा अजुन खूप सुख:दुखा:च्या परिक्षा तु देणार आहेस
आकाशाच्या सरोवरात फूलणारे जीवन तुला उजळायचे आहे
त्यासाठी तुला स्व:तालाच दीप व्ह्यायचे आहे
आणि इतरांना जानाचा प्रकाश द्यायचा आहे..

जीवनातल्या ह्या खडतर प्रवासात
तुला रक्ताळलेल्या पायांनी चालायचंय
आणि सुखा ला मागे सारून , दुखा:ला कवटाळायचंय
शिक्षणाने शिकवले , तुला दुसऱ्यासाठी झिजणं
पण त्यासाठी विसरू नको स्वत:साठी फुलणं दुनियाच्या शाळेत ,
व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यावर्
गुंफत रहा मायेची विण..

जीवनाच्या सप्तपदीतून अनुभवाचे गीत तुला गायचे आहेत
अन धरतीच्या कागदावर, समुद्राच्या शाईने
आभाळाएवढ्या मनाने भारताचे नाव लिहायचेय
शुभस्मरणाच्या कळीतून सुखी जीवनाचा गुलाब तुला उजळायचा आहे
त्यासाठी प्रत्येक फुलाला फूलण्याचा अधिकार तुला द्यायचा आहे
आजच्या स्पर्धेच्या युगात आयुष्याचे गीत मधूरतेने होण्यास
आभ्यासाच्या सुरात , ज्ञानाच्या तलत,अनुभवाच्या बोलात
मधूर शब्दात जीवनाचे गीत तुला गायचे आहे..

पुर्वी अंधाराला तुझे छोटे डोळे घाबरत होते
पण याच डोळ्यांनी तुला साऱ्यांना प्रकाश दाखवायचा आहे
चिमणीसारख्या चिवचिवलेल्या धरतीच्या प्रांगणात कधी काळी
ईवलिशी पावलं टाकत तू आली होतीस
पण याच धरतीच्या प्रांगणात उद्या तुला ताठ मानेने
आदर्श पावले टाकीत यायचे आहे..

लक्षात ठेव -
अंधाराला घाबरणे सोपे असते
पण दीवा लावणे खूप अवघड असते
म्हणून सांगतो , फूल म्हणून जगताना
माती बनून दुसऱ्यांना सुगंध द्यायला विसरू नको
स्पर्धेच्या ह्या युगात प्रवेश करण्याआधी ,
जाता-जाता पित्यासारख्या शिक्षकाचे एवढे लक्षात ठेव
विद्यादानासारखे पवित्र दान आम्ही केले,
त्याचे चीज तुला करून दाखवायचे आहे
अन् सार्‍या संकटाना तोंड देऊन ,
यशाचे शिखर तुला गाठायचे आहे
आणि सुख:दुखा:च्या या विशाल जीवनात
यशस्वी तुला व्हायचं आहे.

No comments: