Thursday, September 9, 2010

देवघर

देवघर
देवघर म्हणजे आपल्या घरातील एक पवित्र जागा . पण ह्या देवघरात देव व्यवस्थित मांडण्याची एक रीत आहे. ती जर समजून घेतली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल.
देवाची मांडणी करताना प्रथम त्याचा क्रम लक्षात घेतला पाहिजे. प्रथम श्री गणपतीची मूर्ती स्थापन करून त्याच्या डाव्या बाजूला आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवावी आणि गणपतीच्या उजव्या बाजूला
आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवावी आणि जर आपले कुलदेव आणि कुलदेवी माहीत नसेल तर कोणत्याही देवीची उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणत्याही देवाची मूर्ती ठेवावी पण , मध्यभागी मात्र श्री गणपतीची मूर्ती स्थापन करावी .पण सर्व देव एका ओळीत न मांडता एकापुढे एक असे ठेवावेत , म्हणजे एक ओळ कुलदेव श्री गणपती आणि कुलदेवी यांची होते तर दुसरे देव त्यांच्या समोर दुसरी ओळ करून मांडावेत. आणि श्यकतो एका देवाची एकच मूर्ती असावी .

No comments: