Monday, September 20, 2010

ब्रेडचा उपमा : -

साहित्य :- ब्रेड चा चुरा १ वाटी , कांदे १ , टोमॅटो १ , जिरे १ चमचा , मोहरी १/२ चमचा , कोथिंबीर , चवीपुरते मीठ ,चाट मसाला थोडासा
कृती :- कढई मधे तेल गरम करून त्यात मोहरी , जिरे ,कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्या . नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या .त्यानंतर ब्रेड चा चुरा भाजून घ्या. वरुन थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि थोडे परतून वरुन थोडासा चाट मसाला भूरभुरावा .

Thursday, September 9, 2010

देवघर

देवघर
देवघर म्हणजे आपल्या घरातील एक पवित्र जागा . पण ह्या देवघरात देव व्यवस्थित मांडण्याची एक रीत आहे. ती जर समजून घेतली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल.
देवाची मांडणी करताना प्रथम त्याचा क्रम लक्षात घेतला पाहिजे. प्रथम श्री गणपतीची मूर्ती स्थापन करून त्याच्या डाव्या बाजूला आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवावी आणि गणपतीच्या उजव्या बाजूला
आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवावी आणि जर आपले कुलदेव आणि कुलदेवी माहीत नसेल तर कोणत्याही देवीची उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणत्याही देवाची मूर्ती ठेवावी पण , मध्यभागी मात्र श्री गणपतीची मूर्ती स्थापन करावी .पण सर्व देव एका ओळीत न मांडता एकापुढे एक असे ठेवावेत , म्हणजे एक ओळ कुलदेव श्री गणपती आणि कुलदेवी यांची होते तर दुसरे देव त्यांच्या समोर दुसरी ओळ करून मांडावेत. आणि श्यकतो एका देवाची एकच मूर्ती असावी .

Wednesday, September 8, 2010

नामजप :

प्रत्येक वारी त्या-त्या देवतांचे स्मरण करण्यासाठी किमान १५ मिनीटे नामजप केल्यास त्याचे फळ लवकर मिळते . तसेच ,
आपल्या कुलदेवतेचे रोज १५ मिनीटे नामजप केल्यास त्याचे फळ लवकर मिळते आणि जर आपल्या कुलदेवतेचे
नाव माहीत नसेल तर फकक्त "ओम कुलदेवताय नम : "एवढे जरी रोज १५ मिनिटे केले तरी कुलदेवतेचे नामजप केल्याचे पुण्य मिळते .

Tuesday, September 7, 2010

अध्यात्माविषयी थोडेसे :

रांगोळी काढताना : रांगोळी काढताना नेहमी घरच्या बाहेर उजव्या बाजूस काढावी . रांगोळी मधे नेहमी "श्रीराम" लिहावे . त्यामुळे वाईट शक्तींपासून आपल्या घराचे रक्षण होते.

Friday, September 3, 2010

मुगाचे धीरडे :

साहित्य : १/२ वाटी मुगाची दल , १ वाटी तांदूळ , आले-लसूण पेस्ट १ चमचा , ओळी मिरची , कोठीबीर, ओवा, जिरे, थोडासा गरम मसाला , कॅनडा.
कृती : प्रथम मूग दल व तांदूळ ४ ते ५ तास भिजत घालावेत . त्यानंटेर ते चांगले धुवून त्याचे वाटण तयार करावे .
तयार वतनात जिरे, हिरवी मिरची चिरून , कॅनडा बारीक चिरून, ओवा , मीठ , कोत्तीबीर ओ थोडासा गरम मसाला टाकून
ते चांगले एकजीव करून घ्यावे व गरम तव्यावेर किवा पनवेर त्याचे धीरडे घालून ते चांगले खरपूस भाजून घ्यावे व
खोबर्यच्या चटणीबरोबर खयला द्यावे

पालक पुलाव :

साहित्य : पालक एक जुडी , टोमॅटो २ , कांदे २, लवंग ४ , दालचिनी ४ , तूप , हिरवा वाटणा , बताते ,ओळी मिरची , फ्लवर , मीठ , कोबी , आले-लसूण पेस्ट १ छ्मचा , जिरे ,हळद , सिमला मिरची , फारसबी
कृती : प्रथम सर्व हिरव्या भाज्या धुवून चिरून घ्याव्या . नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात लवंग , दालचिनी , मीरे, हिरवी मिरची, जिरे, टाकून कां डा भाजून घ्यावा . कॅनडा गरम झल्यावेर त्यात धुवून १५ मिनिटे ठेवलेले तांदूळ टाकावे व ते चांगले भाजून घ्यावेत.
नंतर त्यात गरम पाणी घालून भात चांगला शिजू द्यावा.
इकडे दुसर्या भांड्यात तेल टाकून त्यात जिरे,आले-लसूण पेस्ट
जिरे, मीरे , गरम मसाला, हळद , टोमॅटो भाजून घेऊन त्यात सर्व भाज्या टाकून थोड्या शिजवून घ्याव्यात . आणि दुसर्या भांड्यात तूप घळण त्यावेर एक भातचा तर व एक भाजीचा अस तयार करून भांडे चांगले बंद करून त्याला वाफ येऊ द्यावी . नंतर सर्व्ह क्रवे

khana khajana

ब्रेड चे पॅटिस
साहित्य :- ब्रेड स्लाइस २ , बटाटा भाजी १ वाटी , कोथिंबीर ,चवीपुरते मीठ ,ओवा,आले-लसुंन पेस्ट १/२ चमच
कृती :-ब्रेड च्या भाजी मध्ये ओवा,आले-लसुंन पेस्ट,कोथिंबीर व मीठ घालून प्रथम ब्रेड ची भाजी चांगली मळून घ्या . नंतर ब्रेड चे तुकडे दुधात भिजवून घ्यावे आणि चांगले कोरडे करुन
त्यात तयार भाजी भरून त्याची चांगली पारी करून ते नीट मिटून घ्यावे व ते गोळे मंद आचेवर टाळून घ्यावे व सॉस किवा चटणीबरोबर द्यावे.